मुंबईकरांचा प्रवास होणार आता गारेगार


 मुंबईकरांचा प्रवास होणार आता गारेगार

सप्टेंबर अखेरीस पंधरा इलेक्ट्रिक डबल डेकर बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत


मुंबईची शान असणाऱ्या डबल डेकर बसचे वैभव जपण्यात बेस्ट प्रशासनाला यश येत आहे. कुलाबा येथे पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस दाखल झाली आहे.


मुंबईची शान असणाऱ्या डबल डेकर बसचे वैभव जपण्यात बेस्ट प्रशासनाला यश येत असून, आता येत्या काही दिवसांत मुंबईकरांच्या सेवेत दहा ते पंधरा एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस दाखल होणार आहेत. तत्पूर्वी गुरुवारी या एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे अनावरण करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस दहा ते पंधरा एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

बेस्ट उपक्रमाने याबाबत सांगितले की, एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे गुरुवारी केवळ उद्घाटन करण्यात येणार आहेत. सप्टेंबरच्या अखेरीस एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस रस्त्यांवर धावतील. सुरुवातीला दहा ते पंधरा बस रस्त्यांवर धावतील. त्यानंतर डिसेंबर महिन्यांत उर्वरित २०० एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होतील, 

तर पुढील वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत एकूण २०० एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता नरिमन पॉइंट येथील टाटा थिएटरमध्ये बेस्टचा कार्यक्रम होणार आहे.


  • बेस्ट उपक्रमाच्या महापालिकाकरणास ७५ वर्षे पूर्ण
  • अमृतमहोत्सवी वर्ष
  • प्रीमियम बससेवेचा शुभारंभ
  • कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन
  • स्वयंचलित मार्गप्रकाश पद्धतीचे 
  • दुमजली वातानुकूलित बसगाड्यांचे उद्घाटन
  • बेस्ट उपक्रमाची अमृतमहोत्सवी कथा पुस्तकाचे प्रकाशन


स्वमालकीच्या बसगाड्या नक्की घेणार का?

बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट होणाऱ्या नव्या कंत्राटी दुमजली बसगाड्या अशोक लेलॅण्डच्या बनावटीच्या असून, यांचे मालकी हक्क चलो आणि स्विच मोबिलिटी याच्याकडे आहेत. सुरुवातीला ऑनलाइन तिकीट app ची सुविधा पुरवणारा चलो app आता थेट कंत्राटदार म्हणून बेस्टला बस पुरवू पाहतोय. हे सारे अनाकलनीय आहे. बन्याच वर्षांनी बेस्टच्या तापयात अशोक लेलॅण्डचे पुनरागमन झाल्याचा आनंद तर आहेच, पण या बससुद्धा भाडेतत्त्वावर घेतल्यामुळे पुन्हा एकदा स्वमालकीच्या बसगाड्या बेस्ट नक्की घेणार का? हा प्रश्न मुंबईकर प्रवाशांच्या मनात कायम आहे.



Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.