राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असल्यामुळे जायकवाडी धरणात येणारी पाण्याची आवक सुद्धा वाढली असल्यामुळे यंदा दुसऱ्यावेळेस जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जायकवाडी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, धरणाचे दार क्रमांक 10 ते 27 उघडण्यात आले या अठरा दरवाजे 1.5 इंच वर करून 28 हजार 296 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. तर जलविद्युत केंद्रातून 1 हजार 598 क्युसेक आणि उजव्या कालव्यातून 600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून सद्या एकूण 30 हजार 485 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यावर्षात दोनदा जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहे.
● पुर्ण संचय पातळी (FRL) : 1522.00 फुट
● सध्याची पाणी पातळी (WL) : 1521.06
● फुट जिवंत पाणी साठा (Live) : 2058.688 दलघमी (72.69 टिएमसी)
● एकुण पाणी साठा (Gross) : 2796.794 दलघमी (98.76 टिएमसी)
● पाण्याची आवक (Inflow) : 27155 क्युसेक
● पाण्याचा विसर्ग (Discharge) : सांडव्याद्वारे 28296 क्युसेक,
● जलविद्युत केंद्रातून 1589 क्युसेक,
● उजव्या कालव्यातून 600 क्युसेक,
● एकुण विसर्ग: 30485 क्युसेक.
जायकवाडी धरणातून करण्यात येत असलेला पाण्याचा विसर्ग पाहता गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीत सद्या 30 हजारपेक्षा अधिक क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदी काठच्या गावकऱ्यांनी नदी पात्रात उतरू नयेत असे आवाहन प्रशासनाने केला आहे